
परदेशात नोकरीच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक, आरोपी शिताफीने अटक
एजंटद्वारे परदेशी व्हिजाची माहिती घेवून कोकणातील तरूणांना परदेशी नोकरीला पाठवतो, असे आमिष दाखवत २ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक करत परदेशात पसार झालेल्या मोहम्मद सलीम शगुल हमीद (६१, रा. कोचिपलयाम, तामिळनाडू) याच्या तिरूचिरापल्ली तामिळनाडू विमानतळावरून मुसक्या आवळल्या. त्याचा व्हिजा येथील पोलिसांनी जप्त केला आहे.
जानेवारी २२०१७ मध्ये ओळख झाल्यानंतर तालुक्यातील पटवर्धन लोटे येथे चप्पल विक्रीचा व्यवसाय करणार्या असिफ महामूद सनगे (रा. घाणेखुंट-गवळवाडी यांना वेळोवेी एजंटद्वारे परदेशी व्हिजाची माहिती घेतो व कोकणातील तरूणांना परदेशात नोकरीला लावतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी माझ्या खात्यात पैसे भरत जा, व्हिजासाठी ९ ते १० वर्षे लागतील, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अनेकवेळा विविध बँकांच्या खात्यांमध्ये २ लाख १४ हजार रुपयांची रक्कम जमा केली.
अनेक वर्षे लोटूनही व्हिजाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्याकडे लक्ष न देता टाळण्यास सुरूवात केली. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच असिफ सनगे यांनी पोलीस स्थानक गाठत २७ एप्रिल २०१९ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तामिळनाडू येथे शोध घेण्यात आला असता मोहम्मद हमीद हा परदेशात पसार झाला होता.
www.konkantoday.com