खेड तालुक्यातील सात्विनगाव येथे उंचावरून पडून प्रौढाचा मृत्यू
खेड तालुक्यातील सात्विनगाव येथे समीर पुले प्लॅन्टेशन येथे काम करत असताना उंचावरून खाली पडलेल्या ५२ वर्षीय प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रंजन रामचंद्र बेळगांवकर (५२, रा. कर्नाटक) असे मृत प्रौढाचे नाव आहे. उंचावरून पडून जखमी झालेल्या प्रौढास उपचारासाठी लवले येथील बाई रतनबाई घरडा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी हुबळी कर्नाटक येथील रूग्णालयात घेवून जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com