
ग्रामीण भागात एसटीची वाहतूक सुरू
गेले काही महिने लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात ठप्प असलेली एस़ टी़ बस सेवा पुन्हा सक्रिय होत आहे. सोमवारपासून तालुक्यातील ग्रामीण भागात ही सेवा काही गावांमध्ये सुरू केली. शिवाय एस़ टी़ बस फेऱ्यांच्या संख्येतही वाढ केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे एस़ टी़ सेवाही बंद पडली. गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा बंद आहे. रत्नागिरी, खेड, गुहागर या ठरावीक मार्गावरच एस़ टी़ बस सेवा सुरू होती. तालुक्यातील ग्रामीण भागात एकही एस़ टी़ बस सोडली जात नव्हती. प्रथम तालुका अंतर्गत फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच पूर्ण क्षमतेने एस़ टी़ बस सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
www.konkantoday.com