रत्नागिरी जिल्ह्यातील बालनिरीक्षण गृहात दाखल होणार्या मुलांच्या संख्येत होतेय वाढ
रत्नागिरी जिल्ह्यातील बालनिरीक्षण गृहात दाखल होणार्या मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सन २०२१-२२ मध्ये ७ ते १८ वयोगटातील ५२ मुलांना दाखल करण्यात आले होते तर २०२२-२३ मध्ये यामध्ये ६८ इतकी वाढ झाली आहे. मुले आई-वडिलांजवळ वाढणे आवश्यक असताना दिवसेंदिवस बालगृहातील मुलांची वाढणारी संख्या चिंता वाढवत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून बालकांचे जीवन, सुरक्षा, विकास व सक्षमीकरण आणि सहभाग समग्रपणे व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. बाल संरक्षण व पुनर्वसन सेवेअंतर्गत विभागाने राज्यात बालसंगोपन संस्थांची एक साळखी निर्माण केली आहे. ज्यामध्ये बालगृह, संगोपन केंद्र आणि निरिक्षणगृह तसेच विशेष गृह आदी सेवा देण्यात येत असतात. बालनिरीक्षणगृहात राहणार्या बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहज सामील व्हावेत तसेच त्यांचे पुनर्वसन यशस्वी व्हावे यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
www.konkantoday.com