खेड मोरवंडे येथे मंदिरानजीकच्या परिसरात मादी जातीच्या बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले
खेड मोरवंडे येथे मंदिरानजीकच्या परिसरात मादी जातीच्या बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. हे पिल्लू ५ ते ६ महिन्याचे व ६ ते ७ किलो वजनाचे . बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत निदर्शनास येताच ग्रामस्थांनी या बाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना
कळवले. त्यानुसार वनविभागाच्या स्थानिक वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले. मृतावस्थेतील पिल्लांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. रानटी कुत्रे अथवा अन्य प्राणी व बिबट्याचे पिल्लू यांच्यात झालेल्या झटापटीत गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
www.konkantoday.com