७ जानेवारी २०२४ रोजी पुण्यात होणार्या सहाव्या राष्ट्रभक्ती संमेलन अध्यक्षपदी किरण ठाकूर
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने येत्या ७ जानेवारी २०२४ रोजी पुण्यात होणार्या सहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा तरूण भारत समूह प्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकूर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत शहासने आणि ऍड. नंदिनी शहासने यांनी बुधवारी येथे दिली.
ओळख देशभक्तांची, शाळा तिथे क्रांतिमंदिर या संकल्पनेवर आधारित हे संमेलन होणार आहे. संस्थेने दोन हजार क्रांतिकारकांची चित्रे आणि दहा हजार क्रांतीकारकांची माहिती असणारे प्रदर्शन गावोगावी शाळांमध्ये प्रदर्शित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
हा उपक्रम २६ जानेवारी २०२४ पर्यंत राहणार आहे. यंदाचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनही याच संकल्पनेवर आधारित आहे. यापूर्वी राष्ट्रभक्ती, पर्यावरण, साक्षरता आणि आरोग्य अशा विविध संकल्पनांवर आधारित साहित्य संमेलन घेण्यात आली होती.
www.konkantoday.com