लोटेतील उद्योजकांच्या मागणीनुसार एमआयडीसीने २५ कोटींचा निधी मंजूर केला, मात्र स्थानिक पातळीवर झालेल्या विरोधामुळे निधी तसाच पडून
चिपळूण येथील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी वाशिष्ठी नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्याची मागणी केली असली तरी या नदीवरील बंधारा बांधण्यासाठी ७ वर्षापूर्वीच लोटेतील उद्योजकांच्या मागणीनुसार एमआयडीसीने २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र स्थानिक पातळीवर झालेल्या विरोधामुळे हा निधी आजतागायत तसाच पडून राहिला आहे. यामुळे सुरूवातीला बंधार्याची मागणी, त्यानुसार मंजुरी, त्याला झालेला विरोध आणि आता पुन्हा नव्याने मागणी असा, या नदीवरील बंधार्याचा प्रवास सुरू झाला आहे.
वाशिष्ठी नदीवरील बहाद्दूरशेखनाका येथील जुना पूल तोडण्यास विरोध करतानाच नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्याची मागणी मंगळवारी येथील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. मात्र नदीवरील बंधारा हा सात वर्षापूर्वीच मंजूर झाला आहे. लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून २०१७ पासून कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्याची मागणी करण्यात आली होती व यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने पाटबंधारे विभागाचा २५ कोटी रूपयांचा प्रस्ताव एमआयडीसीने मंजूर केला होता. परंतु स्थानिक पातळीवर झालेल्या विरोधानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी चिपळूण शहरात पाणी भरेल व स्थानिक नेत्यांचा यासाठी विरोध आहे. अशा प्रकारची माहिती जिल्हाधिकार्यांना दिली व २५ कोटी रुपये निधी मंजूर असूनही कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यासाठी चालढकल केली गेली.
www.konkantoday.com