चिपळूण शहरात नव्या सर्व्हेक्षणानुसार सुधारित घरपट्टीची यादी जाहीर
चिपळूण नगर परिषदेने केलेल्या थ्रीडी सर्वेक्षणानुसार सुधारित घरपट्टीची यादी नुकतीच जाहीर केली आहे. ज्यांनी वाढीव बांधकामे व भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्या करात वाढ होणार आहे. मात्र उर्वरित नागरिकांच्या करात कोणतीही वाढ होणार नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही नागरिकांना याबाबत त्यांच्या हरकती व सूचना मांडण्याची मुदत १९ डिसेंबरपर्यंत आहे.
काही महिन्यापूर्वी शासनाच्या आदेशानुसार नगर परिषदेने शहरात थ्रीडी सर्व्हेक्षण केले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या मालमत्तेची पूर्ण माहिती नगर परिषदेकडे नकाशासह प्राप्त झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेने आता सुधारित घरपट्टीची यादी जाहीर केली आहे. शहरात सुमारे ३० हजार नागरिकांच्या घरपट्ट्या आहेत.
त्यातील २ हजार ५०० जणांनी वाढीव बांधकामे, तर २ हजार ५०० जणांनी भाडेकरू ठेवल्याचे या सर्वेक्षणानुसार पुढे आले आहे. त्यामुळे या ५ हजार जणांच्या पूर्वीच्या करात वाढ होणार आहे. मात्र २५ हजार नागरिकांना पूर्वीइतकाच कर भरावा लागणार आहे.
www.konkantoday.com