एमआयडीसी येथील सांडपाणी वाहिनीच्या लाखों रुपयांच्या व्हॉलची चोरी
लोटे पर्शुराम ते असगणी खेड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील टाकण्यात आलेल्या एका सांडपाणी वाहिनीचे तब्बल 3 लाख 6 हजार रुपये किंमतीचे व्हॉल अज्ञातांनी चोरुन नेले..याबाबत किशोर अनंत हळदणकर (52,रा.एमआयडीसी कॉलनी खेर्डी चिपळूण) यांनी याबाबत खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,कोलखिंड असगणी येथील अतिरिक्त मे.अॅक्वा फूडस एक्झीम भूखंड क्रमांक बी 4 या कंपनीच्या बाहेरुन सांडपाणी उदंचन (पंम्पिंग) वाहिनी लोटे पर्शुराम पर्शुराम एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील सीईटीपी पर्यंत टाकलेल्या वाहिनीचे 100 मी.मी व्यासाचे स्टेनलेस स्टीलचे 25 ते 30 किलो वजनाचे तीन एअर व्हॉल अज्ञातांनी चोरुन नेले.यातील प्रत्येक नगाची किंंमत 1 लाख 2 हजार रुपये आहे.
www.konkantoday.com