
जिल्हा बंदीच्या काळात चाकरमान्यांची कोकणात येण्यासाठी धडपड
कोरोनाने मुंबईत थैमान घातल्याने व मुंबईत जागेची अडचण असल्याने कोकणातील चाकरमानी गावात येण्याच्या मनस्थितीत आहेत मात्र रेल्वे बस वाहतूक बंद करण्यात आल्याने तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने चाकरमानी गावात येऊ शकत नाहीत गावात परतण्यासाठी चाकरमानी मिळेल तो मार्ग स्वीकारत आहेत सध्या आंब्याच्या वाहतुकीला शासनाने परवानगी दिली आहे त्यामुळे आंब्याचे ट्रक मुंबईत जात आहेत त्यातून चाकरमानी येण्याचे प्रकार घडत आहेत आंब्याच्या गाड्यातून राजापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत आठ ते दहा चाकरमानी आले मात्र त्यांच्या आगमनाची दखल प्रशासनाने घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com