प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत करणार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भंडारा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात महायुतीचे तिन्ही नेते एकत्र होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी कित्येक योजनांचा पाढा वाचुन दाखवला. तर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सगळ्या अटी काढून टाकल्या असुन आता रेशन कार्डाची अट नाही. उत्पन्नाची अट नाही. असं फडणवीसांनी सांगितले.
www.konkantoday.com