करंजाडी-कामथे विभागादरम्यान मेगा ब्लॉक,मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार

                 कोकण रेल्वे मार्गावरील करंजाडी कामथे विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १२.४० ते दुपारी ३.१० या वेळेत २ तास ३० मिनिटांचा मेगाब्लॉ क घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे

रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
०२१९७क्रमांकाची कोईमतूर – जबलपूर स्पेशल मडगाव- संगमेश्वर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. १०१०६ क्र.ची सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस २१ रोजी सावंतवाडी संगमेश्वर विभागाच्या दरम्याने एक तास दहा मिनिटे थांबवण्यात येणार आहे या मेगाब्लॉकमुळे कोकण मार्गावरील अन्य गाड्यांच्याही वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button