पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता


महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. गॅस सिलिंडरपाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण होत आहे. कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल ७५.९५ डॉलरवर आले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती ५ ते ६ रुपयांनी कमी होऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. (तेल कंपन्यांनी एप्रिल २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. देशातील बहुतांश शहरांमध्ये वाहनचालकांना पेट्रोल-डिझेलसाठी १०० रुपयांपेक्षाही जास्त किंमत मोजावी लागत आहेत. पेट्रोलचे दर १०० रुपये आणि डिझेल ९० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर नेमके कधी कमी होणार, याचीच प्रतिक्षा अनेकांना आहे. दरम्यान, कच्चा तेलाचे दर झपाट्याने कमी झाल्याने आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होऊ, असं अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जर असं झाल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button