कोसुंब घाटात रस्ता खचला गार्डची दुरवस्था
संगमेश्वरः राज्य मार्गावरील कोसुंब घाटात रस्ता खचला असून गार्डची दुरवस्था झाली आहे.
संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावरील घाटात दरड कोसळल्याने रस्ताही खचण्याची भीती निर्माण झाली आहे.. सद्यस्थितीमध्ये साईटपट्ट्यांवरील संरक्षण गार्ड कोसळले असून त्यांची दुरवस्था झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी संगमेश्वर – कोल्हापूर राज्य मार्गावरील संगमेश्वर ते साखरपा ३२ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले होते, मात्र कोसुंब घाटामध्ये दरड कोसळून हा मार्ग धोकादायक बनला आहे. कोसुंब घाटांमधील धोकादायक रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा तसेच
या ठिकाणी संरक्षक भिंत आवश्यक असून तसे न केल्यास वाहतूक बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
www.konkantoday.com