खेड शहरात गांजा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

0
30

खेड पोलिसांनी मुंबई – गोवा महामार्गावरील खवटीनजीक पाठलाग करत २ किलो गांजासह एकास अटक केल्याची घटना ताजी असतानाच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गांजा बाळगणाऱ्या प्रथमेश नरेंद्र कानडे (३२, रा.कातळ आळी – खेड) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ हजार ५१३ रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. संशयितास फीट आल्याने त्याला उपचारासाठी पाठवून नोटीस बजावण्यात आली.

शहरातील नगर परिषद वसाहतीजवळील साई मंदिर परिसरात एकजण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे, पोलीस हेडकॉ न्स्टेबल दीपक गोरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू वैभव ओहोळ आदींनी सापळा रचला. रात्री १०.४५ च्या सुमारास साई मंदिर परिसरात अंधारात खांद्यावर खाकी रंगाची सॅक लावून उभा असलेली एक व्यक्ती निदर्शनास आली.

या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली. या झडतीत एका प्लास्टिक पिशवीमध्ये १७ हजार ५१३ रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करत त्याचा मोबाईलही हस्तगत केला आहे. प्रथमेश नरेंद्र कानडे यास ताब्यात घेत गांजा नेमका आणला कुठून, या बाबत पोलिसांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे समजते. तसेच त्याला फीटही आल्याने उपचारासाठी पाठवून नोटीस बजावण्यात आली आहे.
१-२ दिवसातच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here