कॉलेजला जाण्याचा कंटाळा आल्याने रागाच्या भरात गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या अल्पवयीन मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू


कॉलेजला जाण्याचा कंटाळा आल्याने रागाच्या भरात गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या अल्पवयीन मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी रोजी सायंकाळी 4 वा.घडली.अमर दिपक घाणेकर (17,रा.देवूड पिंपळवाडी,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.शुक्रवारी अमरला कॉलेजला जाण्याचा कंटाळा आल्याने त्याने रागाच्या भरात त्याच्या वडिलांनी पावसाळ्यात गवत मारण्यासाठी आणलेले टिलक्वँट नावाचे औषध प्राशन केले.घरात कोणीही नसल्याची संधी साधत त्याने गुरांच्या गोठ्यात ठेवलेले हे औषध पाण्यात मिळून प्राशन केले.ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी अमरला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.त्याठिकाणी उपचार सुरु असताना त्याचा उपचारांदरम्यान सायंकाळी 4 वा.मृत्यू झाला.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button