रत्नागिरी शहरातील मांडवी जेटी येथील पथदीप अज्ञातांकडून फोडून नासधूस, कारवाईची मागणी
रत्नागिरीच्या सौंदर्यात बाधा आणण्याचे काम काही विघ्न संतोषी लोक करीत आहेत रत्नागिरीकर यांचे आवडते स्थळ असलेल्या मांडवी जेटीचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले होते
रत्नागिरी शहरातील मांडवी जेटी येथील पथदीप अज्ञातांकडून फोडून नासधूस केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांच्या निदर्शनास आली. दरम्यान या घटनेची खबर रत्नागिरी शहर पोलिसांत देण्यात आली असून त्यानुसार पोलिसांकडून
पुढील कारवाई करण्यात येत आहे. रत्नागिरीतील प्रमुख पर्यटन असलेल्या मांडवी जेटी येथे सायंकाळी रत्नागिरीकर फिरण्याचा आनंद लुटत असतात. तसेच बाहेरूनही पर्यटक मांडवी बीच या ठिकाणी येतात. हीच बाब लक्षात घेवून जेटीवर दिवे लावण्यात आले होते. जेटीवर सायंकाळच्या सुमारास होणारा झगमगाट रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालणारा होता. मात्र गुरूवारी रात्रीच्या सुमारास जेटीवरील अनेक दिवे दगड अथवा काठीच्या सहाय्याने फोडल्याचेसमोर आले आहे. अशा नाच दोष करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com