
बनावट पदवीप्रकरणी शिक्षकाचा अर्ज फेटाळला
रत्नागिरी ः पदोन्नती घेण्यासाठी अलाहाबाद येथील विद्यापीठाचे जोडलेले पदवी प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षकाला पदावनत करण्याचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या रमाकांत शिगवण यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यातील शिगवण यांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी घेतल्याचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेला सादर केले होते. त्यामुळे त्यांना पदोन्नती देण्यात आली होती मात्र छाननीत अलाहाबाद विद्यापीठाची पदवी बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना पदावनत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याविरोधात शिगवण हे उच्च न्यायालयात गेले होते. आता या निर्णयानंतर जिल्हा परिषदेने कायदेशीर मार्गदर्शन मागविले असून त्यानंतरच कायदेशीर निर्णय घेण्यात येणार आहे.
www.konkantoday.com