६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ च्या रत्नागिरी केंद्रावर रंगणार
रत्नागिरी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ च्या रत्नागिरी केंद्रावर रंगणार आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला येत्या २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असून ३ डिसेंबरला या स्पर्धेच्या समारोपाचा नाट्यप्रयोग रंगणार आहे. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावर ही नाट्यस्पर्धा होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६२
व्या नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण येथे होणाऱ्या या स्पर्धेतील प्राथमिक फेरीमध्ये एकूण ६ नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.
www.konkantoday.com