
दिवाळीत दापोली पोलीस स्थानकाच्यावतीने शहरात गांजा शोध मोहीम राबविल्याने संबंधिताचे धाबे दणाणले
दापोली: दिवाळीत दापोली पोलीस स्थानकाच्यावतीने शहरात गांजा शोध मोहीम राबवण्यात आली
सध्या व्यवसाय जिल्ह्यामध्ये गांजा पोलिसांच्या करणारे रडारवर आले आहेत. याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात गांजा विक्री करणाऱ्या काही भाजीच्या दुकानांची व टपऱ्यांची पोलिसांकडून झडती घेण्यात आली.
यावेळी पोलिसांकडून दापोलीदाभोळ रस्त्यावर असणाऱ्या एका भाजी दुकानाची, तसेच आझाद मैदानालगत असणाऱ्या एकाचहाच्या टपरीचीही कसून चौकशी. करण्यात आली. मात्र या शोध मोहिमेमध्ये पोलिसांच्या हाती काय लागले याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
www.konkantoday.com