
वादळी हवामानामुळे समुद्राला उधाण, मिर्या भागाला फटका
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळी वादळी वातावरण आहे. वादळी वातावरणामुळे समुद्राला उधाण येत असून त्याचा फटका मिर्या, भाटिमिर्या भागाला बसला. या भागातील मयेकर, तावडे, सनगरे कुटुंबियांचे माडाची झाडे कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी घातलेला कच्चा बंधारा पडुन समुद्राच्या उधाणाच पाणी आत घुसले.
www.konkantoday.com