
जिल्ह्यात १ लाख १३,८४३ आयुष्यमान कार्डधारक
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ४ लाख १ हजार ४५१ लाभार्थी आहेत. त्यापैकी १ लाख १३ हजार ८४३ जणांनी आयुष्यमान कार्ड काढले आहे. सध्या १ लाख रूपयांच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
या योजनेंतर्गत साडेतीन लाखांपर्यंत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत दीड लाखापर्यंत मोफत उपचारांची सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभाग स्तरावर करण्यात आले आहे. केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत ३.५० लाखांपर्यंत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १.५० लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे. www.konkantoday.com