
गाडीचे भाडे मागायला गेलेल्यांना मारहाण शहर पोलिसात तक्रार दाखल
रत्नागिरी ः गाडीच्या भाड्यासह नुकसान भरपाई मागणार्या गाडी मालकालाच मारहाण करणार्या तिघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुसैफ उमर मस्तान (रा. मिरकरवाडा) यांच्या मालकीची स्विफ्ट डिझायनर कार त्यांनी येथीलच बाबामिया मुकादम यांना भाडे तत्वावर दिली होती. बाबामिया कार घेवून कामासाठी मुंबईत केले होते. मुंबई येथून परतत असताना ही कार दगडाला घासून नुकसान झाले होते. बाबा मुकादम यांनी कार दोन महिने वापरली होती. तसेच दोन महिन्याचे भाडे देखील दिल नव्हते. भाड्याची वारंवार मागणी केली जात होती. अखेर २५ मे रोजी सायंकाळी गाडीची नुकसान भरपाई व दोन महिन्याचे भाडे देतो असे कबूल केले होते. गाडीचे बाडे व नुकसान भरपाई घेण्याकरिता मुसैफ यांची आई व पत्नी मुकादम यांच्या घरी गेली होती. त्यावेळी बाबामिया यांचा मुलगा सकलेन व बाबामिया यांच्या पत्नीने मुसैफ यांच्या आईला व पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली.