मुंबई गोवा महामार्गावरील आवाशीनजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू
-मुंबई गोवा महामार्गावरील आवाशीनजीक एका अज्ञात वाहना च्या धडकेत गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नर जातीच्या सांबराचा मृत्यू झाला.महामार्ग वर वन्यप्राणी असल्याचे निदर्शनास आल्याने सचिन खोपकर यांनी सकाळी सात वा.स्थानिक वन अधिकारी यांना दूरध्वनीव्दारे कळविले.वनविभागाला ही बातमी प्राप्त होताच घटनास्थळी वनक्षेत्रपाल दापोली पी.जी.पाटील यांनी पाहणी केली.सांबर मृत अवस्थेत दिसून आला.मृत्यू पावलेला सांबर हा नर जातीचा असून त्याचेअंदाजे वय ७ ते ८ वर्ष असावे,वाहनाचा जोरदार धक्का बसल्याने सदर सांबर मृत झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले त्याच्या तोंडाला मार लागुन रक्त येत होते तर पाठीमागील उजव्या पायावरती खरचटलेल्या खुणा दिसुन आल्या. मृत सांबर ताब्यात घेवुन पशुवैद्यकिय अधिकारी खेड यांजकडून तपासणी केली असता सकाळी पहाटे चे चार ते पाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
www.konkantoday.com