रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅग अज्ञाताने लांबवली
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅग अज्ञाताने लांबवली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मॅजेश मोहनन पोडियाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार, ते त्रिशुर केरला येथ्ाून एर्नाकुलम होक्का एक्सप्रेसने केरळ ते पनवेल असा प्रवास करत होते.ते 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 4.26 वा.प्रवास करत होते.त्यांची रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली असता अज्ञाताने त्यांची 15 हजार रुपये किंमतीची लॅपटॉप असलेली बॅग लांबवली.याप्रकरणी भादंवि कायदा कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com