
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधील विजय धनशक्तीमुळे, माजी आमदार रमेशभाई कदम यांचा आरोप
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ आणि रायगडमध्ये माहितीच्या उमेदवारांना मिळालेले यश हे धनशक्तीचे यश आहे, अशी प्रतिक्रिया चिपळूणचे माजी आमदार चिपळूण नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेशभाई कदम यांच्याशी दैनिक सागरने संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशात म्हणावे तसे यश भाजपला मिळालेले नाही.गेल्या दहा वर्षात भाजप सरकारने जीएसटी नोटाबंदी अशा विविध प्रकारे सर्वसामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे काम केले. तरीही भाजपला बर्यापैकी यश मिळाले हा पराभव लोकशाहीचा आहे. असेही मत आमदार रमेश कदम यांनी नोंदविले. रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळेल असे वाटत होते. सुरूवातीला मतदारांचा प्रतिसाद ही चांगला होता. परंतु शेवटच्या तीन चार दिवसात धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला, अशी शक्यता रमेशभाई कदम यांनी व्यक्त केली.www.konkantoday.com