
मोठ्या दिराने केली सहा महिने महिलेवर जबरदस्ती
नवरा नोकरीसाठी दुबईत गेल्याने सासरी एकटीच असलेल्या महिलेवर तिच्या मोठ्या दीराने सहा महिने जबरदस्ती करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची घटना चिपळूण तालुक्यातील पिंपरी येथील नुराणी मोहल्ल्यात घडली आहे.अत्याचाराला कंटाळलेल्या महिलेने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी या प्रकरणात मन्सूर महामुद बोधले याला ताब्यात घेतले आहे.
यातील फिर्यादी महिलेचे माहेर कोल्हापूर जयसिंगपूर येथे असून या महिलेचा विवाह २०१६साली पिंपरी येथील तरुणाशी झाला होता. त्यानंतर हा तरुण नोकरीसाठी दुबईत गेला होता त्यामुळे ही महिला सासरी एकटी राहत होती .त्याचा फायदा घेत तिच्या मोठ्या दिराने मे २०१७ ते ऑक्टोबर २०१७या सहा महिन्यांच्या कालावधीत तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले तिच्यावर घरांमध्ये व कोल्हापूर येथे लॉजवर नेऊन शारीरिक अत्याचार केला. सदर महिलेने हा प्रकार आपला पती घरी आल्यानंतर सांगितला परंतु त्याने विश्वास न ठेवता तिला सोडून जाण्याची धमकी दिली मोठा दीरही धमकी देऊन वारंवार शारीरिक अत्याचार करत होता. शेवटी या अत्याचाराला कंटाळून या महिलेने अलोरे पोलीस स्थानकात धाव घेऊन आपली कैफियत मांडली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
www.konkantoday.com