
कौटुंबिक वादातून पतीवर सुरीने वार केल्याप्रकरणी पत्नी विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कौटुंबिक वादातून पतीवर सुरीने वार केल्याप्रकरणी पत्नी विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.20 वा.मजगाव रोड येथील किस्मत बेकरीसमोर घडली
याबाबत पती बशीर ईसाक प्रभुलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,या दाम्प्त्यामध्ये गेली 15 वर्षांपासून कौटुंबिग वादविवाद आहेत.त्यामुळे बशीर प्रभुलकर अधुनमधून मुलांना पाहण्यासाठी रत्नागिरीत येत असतात.शनिवारी ते मुलांना पाहण्यासाठी गेले असता त्यांनी पत्नीला तू माझ्या आई-वडिलांना फोन करुन शिवीगाळ का करतेस तसेच तुला जेव्हा पैसे हवे असतात तेव्हा तू माझ्याशी गोड बोलतेस व विनाकारण माझ्या आईला त्रास का देतेस असे विचारले.
असा जाब विचारल्याच्या रागातून पत्नीने किचनमध्ये जाउन कांदा कापण्याच्या छोट्या सुरीने पती बशीरच्या उजव्या हाताच्या खांद्याखाली मारुन दुखापत केली
www.konkantoday.com