
मिरकरवाडा जेटी येथे नौकांवर अमली पदार्थ ? सखोल चौकशीची मागणी
मिरकरवाडा जेटी येथे नौकांवर अमली पदार्थ मिळून आले असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेचे अध्यक्ष रंजीत भाटकर यांनी केली आहे.
रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील जेटीवर मच्छिमार नौकांवर अमली पदार्थाचा विनिमय चालू असतो. मात्र हे अमली पदार्थ कोण आणतात? याचा प्रमुख कोण? याचा तपास करण्यासाठी मिरकरवाडा जेटीवर असणारे सर्व सीसीटीव्हीची तपासणी व्हावी. तसेच या ठिकाणचे काही सीसीटीव्ही बंद आहेत, ते देखील चालू करण्यात यावेत. अशा स्वरूपाच्या मागणीचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांना शाश्वत मच्छीमार हक्क संघ रत्नागिरी तालुका, जिल्हा रत्नागिरी देण्यात आले असून, रणजीत भाटकर यांनी या गंभीर विषयाला वाचा फोडली आहे.
तसेच सदर अमली पदार्थ प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, आ. राजन साळवी आणि जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांस कडे करण्यात आली आहे.
www.konkantoday.com