
भाजप अनुसूचित जाती मोर्चा उत्तर जिल्हा अध्यक्षपदी अनिल सावर्डेकर
चिपळूण : सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे शहरातील काविळतळी येथील अनिल अशोक सावर्डेकर यांची भारतीय जनता पार्टी, उत्तर रत्नागिरी जिल्हा अनूसुचित जाती मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजप उ. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी त्यांना नियुक्त पत्र दिले आहे.
राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. शहरासह तालुक्यात त्यांचा युवा वर्गासह मोठा जनसंपर्क आहे.
जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाची ध्येय-धोरणे व कार्यक्रमांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी.
“आगामी काळात आपण सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटन अधिक मजबूत करून विविध निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून द्यावी” अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी व्यक्त केली आहे. तर पक्षाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याबरोबरच सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही अनिल सावर्डेकर यांनी दिली
www.konkantoday.com