ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी यांच्या खुनातील आरोपी महेश मंगलप्रसाद चौगुले याचा जामीन अर्ज फेटाळला
ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी यांच्या खुनातील आरोपी महेश मंगलप्रसाद चौगुले (३९, रा. मांडवी सदानंदवाडी, रत्नागिरी) याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. पैशाच्या हव्यासापोटी किर्तीकुमार कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स येथे खून केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी महेश चौगुले याच्यासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करत अटक केली होती.
www.konkantoday.com