मध्य रेल्वेची दलालांवर कारवाई, २६९ गुन्हे नोंद, ३१७ जणांना अटक


मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षित तिकिटांच्या काळाबाजार/दलालांचा सामना करण्यासाठी आणि बोनाफाईड प्रवाशांचे हित जपण्यासाठी तिकीट दलालांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे.सायबर सेलकडून मिळालेल्या डेटा आणि इतर इनपुटच्या आधारे मध्य रेल्वेचे आरपीएफ पथक छापे टाकत आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात हे छापे टाकण्यात आले.

चालू वर्षात एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दलालीच्या २६९ गुन्ह्यांची नोंद करण्यात येऊन आतापर्यंत ३१७ जणांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली असून त्यांना रु. ३.४२ लाख दंड वसूल करण्यात आला.

या २६९ प्रकरणांपैकी २३ एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू वर्षात एकट्या मुंबई विभागात दलालीचे ९७ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत ११७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भुसावळ विभागात ७२ गुन्हे दाखल झाले असून ७७ जणांना अवैध धंदेप्रकरणी अटक करण्यात आली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button