
रत्नागिरी जिल्ह्यातील आश्रमशाळा आणि मदरसामधील बारा हजार बालकांना देणार गोवर-रूबेला लस
रत्नागिरी जिल्ह्यातील आश्रमशाळा आणि मदरसामधील ५ ते १५ वयोगटातील बालकांमध्ये गोवर रूबेला आजाराचे उच्चाटन करण्यासाठी एक विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समन्वयाने सुमारे २००० बालकांना गोवर रूबेला लस दिली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी सांगितले.
या लसीकरणाचे १५ टक्के पेक्षा जास्त उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी शाळांच्या शिक्षकांना १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मोहिमेचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते.
www.konkantoday.com




