
ठाण्यातील फेमस मामलेदार मिसळीवर CM शिंदेंनी मारला ताव;
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दीपावलीच्या निमित्ताने तलाव पालीला फेरफटका मारत थेट ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळ खाण्याचा आंनद लुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी देखील मिसळवर ताव मारला.मिसळ खाल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मिसळचे पैसे आणि तेथील कामगारांना दिवाळी भेट देखील दिली.
दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा, ही दिवाळी सर्वांना सुखी समृद्धी आनंदाची जावो म्हणत शिंदेंनी राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ठाणेकरांचा जल्लोष ओसंडून वाहतोय. गेल्यावर्षी पण जोर होता. त्यापूर्वी बंद होतं. आपलं सरकार आल्यापासून सगळी बंधनं काढली. दसरा दिवाळी सगळं साजरं करतोय.
आपले सण उत्सव ही परंपरा वाढवायला हवी. ते काम ही तरुणाई करते, धर्मवीर आनंद दिघेंचा हा बालेकिल्ला आहे. सर्वांनी उत्सव पर्यावरणपूरक साजरा करुया आणि संस्कृती कायम ठेवूया असंही पुढे शिंदे म्हणाले.
www.konkantoday.com