प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४४५ गाड्यांना ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’

रत्नागिरी- एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४४५ गाड्यांना ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’ करण्यात आले आहे.प्रवाशी गाडीत शिरल्यावर ठिकठिकाणी स्पर्श होत असतो. एस.टी.तील सर्व सीट, हँड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, चालक केबिन, फ्लोअरिंग, रबर ग्लेझिंग्ज, प्रवासी येण्या-जाण्याचा मार्ग, आतील बाजूला, सामान कक्षाच्या बाहेरील व आतील बाजूला ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग करण्यात आले आहे. एस. टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कोरोना व साथरोग पसरविणाऱ्या विषाणूंपासून संरक्षण होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button