मद्यपी मुलाकडून आई-वडिलांना मारहाण,मुलावर सावर्डे पोलिसात गुन्हा दाखल
चिपळूण: मद्यपी मुलाने आई-वडिलांना मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी तालुक्यातील निवळी येथे घडली. या प्रकरणी मुलावर सावर्डे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल अनंत शिंदे (निवळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद त्याचे वडील अनंत दिनकर शिंदे (७०, निवळी) यांनी दिली. अनिल याला दारुचे व्यसन आहे. वडील अनंत शिंदे व आई अनिता शिंदे अंगणात बसले असताना अनिल हा घरातून अंगणात आला व आईशी भांडण करत तिला लाकडी दांडक्याने पाठीत मारले. हे भांडण सोडवण्यासाठी अनंत शिंदे गेले असता अनिलने त्यांच्या डोक्यातही दांडका मारल्याने ते जखमी झाले आहेत.
www.konkantoday.com