अपरिपक्व मासा पकडणे, खरेदी-विक्रीवर निर्बंध,वाणिज्यदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ५४ मत्स्य प्रजातींचे किमान कायदेशीर आकारमान निश्चित

0
51

राज्य सल्लागार व सनियंत्रण समितीने महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधीमध्ये कोणत्याही मासेमारी नौकेद्वारे तसेच दंतचक्र यंत्राद्वारे पकडल्या जाणाऱ्या वाणिज्यदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ५४ मत्स्य प्रजातींचे किमान कायदेशीर आकारमान निश्चित केले आहे.
त्यासंबंधीचा शासन निर्णयसुद्धा पारित झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मत्स्य साठ्यांच्या शाश्वत जतनासाठी मच्छिमारांबरोबर मत्स्य व्यापारी, विक्रेते आणि खवय्यांची जबाबदारी वाढली आहे. कारण भविष्याच्या दृष्टीने सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून योग्य वाढ न झालेला अपरिपक्व मासा पकडणे व त्याची खरेदी-विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

बऱ्याचदा परिपक्वतेच्या किमान आकारमानाएवढे होण्यापूर्वीच मासे पकडले जातात. त्यामुळे त्यांच्या जीवनकाळात त्यांना एकदाही प्रजनोत्पादनाची संधी मिळत नाही. त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर होतो. त्यामुळे लहान आणि कोवळे मासे पकडणे टाळले जावे, यासाठी सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून शासनाने ५४ माशांचे किमान कायदेशीर आकारमान निश्चित केले आहे. विशिष्ट पद्धतीच्या मासेमारी जाळ्यांमध्ये लहानलहान मासेही सापडतात. त्यामुळे माशाची वाढ निश्चित करण्यात आली आहे. त्याला कायद्याचा आधार मिळाल्यामुळे आता अशा मासेमारीवर थोडेतरी निर्बंध येतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

महत्त्वाचे मासे, किमान कायदेशीर आकारमान

सुरमई ३७० मिमी, बांगडा १४० मिमी, काट बांगडा २६० मिमी, तेल बांगडा ११० मिमी, सरंगा २७० मिमी, शेवडच्या तीन प्रजाती ५००, ३०० आणि २०० मिमी, फटफटी १५० मिमी, तारली १०० मिमी, सिल्व्हर पापलेट १३५ मिमी, चायनीज पापलेट १४० मिमी, घोळ ७०० मिमी, लेपा १५० मिमी, भारतीय म्हाकूल १०० मिमी, कटलफिश १०० मिमी, टायनी कोळंबी ७० मिमी, कापशी कोळंबी ११० मिमी, झिंगा कोळंबी ९० मिमी, फ्लॉवर टेल कोळंबी ६० मिमी, बळा ४५० मिमी, सौंदाळा १०० मिमी, तीन प्रकारचे खेकडे ९०, ७०, ५० मिमी, मुशी (शार्क ६ प्रजाती) ५३० मिमी, पाकट ५०० मिमी, शेंगाळा दोन प्रजाती २९०, २५० मिमी, मुंबई बोंबील १८० मिमी, तीन खेकडा प्रजाती ९०, ७०, ५० मिमी, मोडुसा ६१० मिमी, मांदेली ११५ मिमी.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here