
डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी बनवले 22 प्रकारचे सुगंधित साबण
चिपळूण डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत यंग आंत्रप्रेन्युअर क्लब’ या .उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी २२ प्रकारचे सुहासिक साबणासह रंगीबेरंगी मेणबत्ती, सुगंधी उटणे, पणत्या, गिफ्ट बॅग बनवल्या. विद्यार्थ्यांच्या मनात
व्यवसायाची आवड निर्माण व्हावी व शिक्षणासह त्यांच्या अंगभूत कलागुणांना उजाळा मिळावा म्हणून डिझायनर पणत्या, सुगंधी उटणे, सुवासिक साबण व रंगीत मेणबत्ती त्यांचे उत्पादन व विक्री करण्याचा अनुभव देणारी ही कार्यशाळा या संस्थेचा एक मानदंड बनली आहे
www.konkantoday.com