वांद्रे-वरळी सी-लिंकवर मोठा अपघात,चार गाड्यांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी

0
49

वांद्रे-वरळी सी-लिंकवर मोठा अपघात झाला. वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीनं जोरदार धडक दिली.चार गाड्यांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
मुंबईतील वरळी-वांद्रे समुद्र सेतू अर्थात वरळी-वांद्रे सी लिंक हा मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक. याच मार्गावर गुरुवारी रात्री विचित्र अपघात घडला. सहा वाहनांची एकमेकांना धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय आणि लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वरळीहून वांद्र्याच्या दिशेनं भरधाव वेगात इनोव्हा कार जात होती. इनोव्हा कारमधून सहा प्रवासी प्रवास करत होते. ही इनोव्हा कार सर्वात आधी सी-लिंकवर मर्सिडीज गाडीला धडकली. त्यानंतर सुसाट वेगानं तिथून निघून गेली. पुढे जाऊन या कारनं वांद्रे सीलिंकवरील टोलनाक्यावर टोल भरत असलेल्या इनोव्हा आणि क्विड गाडीला पाठीमागून जोरदार धडक मारली. इनोव्हा गाडीच्या पाठोपाठ होंडा सिटी कारनंही इनोव्हा गाडीला धडक देत, वांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाका 11 आणि 10 वरुन जाणाऱ्या टॅक्सिला धडक दिली. अचानक झालेल्या विचित्र अपघातामुळेसर्वजण पुरते घाबरले होते.

वांद्रे वरळी सी लिंकवर झालेल्या विचित्र अपघातानंतर तात्काळ टोलनाक्यावर उपस्थित कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीनं सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तीन जणांना मृत घोषित करण्यात आलं.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here