भाजप महिला मोर्चाच्या वतीने जन्मपूर्व संस्कार आणि गरोदरपणात घ्यावयाची काळजी यावर कुवारबाव येथे मार्गदर्शन संपन्न
रत्नागिरी : भा.ज.पा. माहिला मोर्चाच्या मार्फत महिला आरोग्य जनमागृती मोहिमे अंतर्गत अंगणवाडी केंद्र, रविंद्रनगर कुवारबाव येथे जन्मपूर्व संस्कार आणि गरोदरपणात घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात आले. यावेळी मनशक्ती केंद्र लोणावळा, यांचे स्थानिक प्रतिनिधी श्री. मनोहर पालकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी मनशक्ती केंद्र प्रयोगकेंद्र यांची जन्मपूर्व संस्कार संशोधनाची माहिती दिली. आणि सर्व महिलांना आपले बाळ अधिक संस्कारक्षम, राष्ट्रप्रेमी कसे होईल याविषयी माहिती दिली. यावेळी पालकांसोबत एकूण ४० महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला भा.ज.पा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रियल जोशी, युवा मोर्चाच्या सावंत’ तसेच शहर चिटणीस श्री. रमाकांत आयरे, अंगणवाडी सेविका सौ. रेणूकाताई आणि आशाताई सौ. रंजना पाटील उपास्थित होत्या.
www.konkantoday.com