
चिपळूण शहरातील गोवळकोट, परिसरात नगर पालिकेकडून मचूळ व खारट पाणी पुरवठा महिलांची पालिकेवर धडक
चिपळूण : वारंवार तक्रार करूनही अधिकारी, दखल घेत नाहीत. हे दूषित पाणी पिऊन आम्ही पडायचे का, असा सवाल करीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मचूळ व खारट पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारला. काही दिवसात यामध्ये सुधारणा झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही या वेळी प्रशासनाला दिला. पेठमाप
गेले कित्येक दिवस चिपळूण शहरातील गोवळकोट, परिसरात नगर पालिकेकडून मचूळ व खारट पाणी पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, महिलांनी पालिकेवर धडक मारून नगरपालिकेचे प्रशासनाधिकाऱ्यांना निवेदन दिले यामध्ये सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला
www.konkantoday.com