
राज्यातील सात जिल्ह्यांत डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळले
राज्यात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण राज्यातील सात जिल्ह्यातील आहेत. या रुग्णांना वेगळे ठेवले. आणि त्या रुग्णांचा प्रवासाचा इतिहास, संपर्क ट्रेसिंग आणि त्यांना लस दिली आहे का याची माहिती गोळा करत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
केंद्र सरकारने नुकताच कोरोनाच्या डेल्टा प्लस चा समावेश व्हेरिअंट ऑफ कॉनसर्न (Variant of Concern) या श्रेणीमध्ये केला आहे. देशभरात आत्तापर्यंत जवळपास ४० कोरोना रुग्णांमध्ये डेल्टा प्लस हा करोनाचा प्रकार आढळला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील २१ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संक्रमण क्षमतेत वाढ, फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता, मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रतिसाद कमी होण्याची शक्यता अशी या विषाणूंची वैशिष्ट्ये आहेत.
www.konkantoday.com