प्राथमिक शाळांमध्ये तात्पुरती नियुक्ती केलेल्या ७०० शिक्षकांच्या मानधनासाठी तरतूद संपुष्टात, शासनाकडून तातडीने दखल
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये तात्पुरती नियुक्ती केलेल्या ७०० शिक्षकांच्या मानधनासाठी तरतूद केलेल्या मात्र संपुष्टात आलेल्या निधीची शासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. शासनाने ६ कोटी ९३ लाखांची तरतूद करून या बाबतचा शासन निर्णयही काढला आहे. त्यामुळे निधीअभवी त्या शिक्षकांवर येणारे गंडांतर टळले आहे.
जिल्हा परिषद सेसमधून तात्पुरत्या शिक्षकांच्या मानधनासाठी यापूर्वी २ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम संपुष्टात आली होती.
www.konkantoday.com