देवरुखात राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे २४ पासून आयोजन, दोन गटात होणार स्पर्धा


संगमेश्वर : रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित व महाराष्र्ट राज्य कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने देवरुख येथे आमदार चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष प्रदीप भाटकर यांनी पञकार परिषदेत दिली.

देवरुख मराठा भवन येथे २४,२५,२६ नोव्हेंबर रोजी या स्पर्धा होणार आहेत. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात स्पर्धा होणार आहेत. खेळाडूंनी आपली नावे मिलींद साप्ते ( 9422433055) यांचेकडे १७ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदवायची आहेत. चिपळुण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम पुरस्कृत आमदार चषक व रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धा प्रमुख म्हणुन मोहन हजारे काम पहाणार आहेत. स्पर्धेसाठी एकुण १ लाख १० हजाराची पारितोषिके व चषक दिले जाणार आहेत. राज्यभरात जवळपास २५० कॅरमपटु सहभागी होणार आहेत.

या निमित्ताने राज्यभरातील कॅरमपट्टूंचा खेळ तालुकावासियांना पहाता येणार आहे. यामध्ये विश्वविजेता प्रशांत मोरे, संदिप दिवे, योगेश परदेशी, देवरुखचा कॅरमपटु, सार्क विजेता संदिप देवरुखकर, राजन कुमारी, संगीता चांदोरकर, अंबिका हेरद, अनुपमा केदार, रत्नागिरीची आकांक्षा कदम, रियाज अकबर अली, राहुल भस्मे, यांचा खेळ पहायला मिळणार आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रदिप भाटकर, सुरेंद्र देसाई, मिलींद साप्ते, नितीन लिमये, मंदार दळवी, मोहन हजारे यांनी केले आहे.

या पञकार परिषदेला कॅरम असोसिएशन पदाधिकारी तसेच कॅरमपटु दिलीप विंचु, बाबा जाधव आणि राष्र्टवादी काँग्रेसचे प्रफुल्ल भुवड,बाळु ढवळे,पंकज पुसाळकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button