सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारला
सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारला. यावेळी ठिय्या आंदोलन करत कुलगुरूंना विदूषकाची प्रतिमा भेट दिली.तसेच कुलगुरू राजीनामा द्या, राजीनामा द्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजेत, झाल्याचं पाहिजेत अशा आशयाच्या घोषणा देत मनविसे शिष्टमंडळाने खाली जमिनीवर बसून ठिय्या केले. यावेळी सरचिटणीस गजानन काळे, अखिल चित्रे, प्रमुख संघटक यश सरदेसाई, चेतन पेडणेकर, सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठाचा विदूषकी कारभार सुरू आहे म्हणून अशा पद्धतीने विदूषकाचे मास कुलगुरूंना मनसे विद्यार्थी सेनेकडून देण्यात आले यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि सुरक्षा रक्षकांची बाचाबाची झाली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलल्याने आणि नव्याने मतदार नोंदणी करावी लागत असल्याने मनसे विद्यार्थी सेना प्रामुख्याने आक्रमक झाली.
www.konkantoday.com