
मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी आरपीआयने खेड तहसील यांना दिले निवेदन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुका वतीने खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना आरपीआय चे खेड तालुका अध्यक्ष विकास धुत्रे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार मागासवर्गीय लोकांचे पदोन्नती आरक्षण तात्काळ देण्यात यावे या मागण्याची निवेदन तहसीलदार प्राजक्ता घोरपडे मॅडम यांना देण्यात आले. खेड पोलीस ठाण्याच्या विनंतीनुसार व कोरोना महामारी चा विचार करून प्रमुख लोकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना आरपीआय चे खेड तालुका युवक अध्यक्ष विकास धुत्रे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने पदोन्नती आरक्षण तातडीने देण्यात यावे यासाठी खेड तालुका तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन केले जाणार होते परंतु रत्नागिरी जिल्हा मध्ये वाढता कोरोना पादुर्भाव आणि जमावबंदी असल्याने. सदर आंदोलन कोरोना काळाचा विचार करून आंदोलन न करता कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सुचवत असलेल्या मागनी मान्य न केल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात जनतेला घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआय चे विकास धुत्रे यांच्या वतीने देण्यात आला.
यावेळी आरपीआय तालूका सरचिटणीस सुरेंद्र तांबे महिला आघाडी तालुका अध्यक्ष रेश्मा तांबे खेड शहर अध्यक्ष दिपेंद्र जाधव युवा नेते गणेश शिर्के मिलिंद तांबे शकर तांबे आर पी येवले गोपी जाधव बाळकृष्ण देवळेकर प्रकाश जाधव विजय गमरे गौतम येळवे प्रफुल्ल तांबे जितेंद्र तांबे श्रीकांत सकपाळ सचिन तांबे गौतम लक्ष्मण तांबे गौतम लखु तांबे पराग गमरे सुधीर जाधव कार्यकर्ते उपस्थित होते
www.konkantoday.com