
संगमेश्वर तालुक्यात कापणी, पेरणीत संगमेश्वरात सर्प, विंचूदंश प्रमाणात वाढ
संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पावसावर अवलंबून असणारी भातशेती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जाते. भातशेती तसेच वायंगणी शेतीच्या पेरणी, कापणीच्या वेळी संगमेश्वर परिसरातील गावांमध्ये शेतकर्यांना सर्वाधिक सर्प, विंचूदंश झाल्याचे निदर्शनास आले असून केवळ तीन महिन्यात १२० जणांना सर्पदंश, विंचूदंश व अन्य प्राण्यांनी चावा घेतल्याचे ग्रामीण रूग्णालयातील आकडेवारीवरून पुढे आले आहे.
प्रामुख्याने कापणी, पेरणीच्यावेळी मे ते जूनच्या दरम्यान व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक सर्पदंश झाले आहेत. यामध्ये विंचूपेक्षा सर्पदंशाचे प्र्रमाण सर्वाधिक आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात १५ मे, ८ जून, २० जुलै १४ ऑगस्ट महिन्यात १५ जणांना सर्पदंश झाला आहे.
www.konkantoday.com