
राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार,हा निर्णय बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली असून महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे.काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
या आधी जून महिन्यात राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता देण्याचं जाहीर केलं होतं. आता त्यात दोन टक्क्यांची वाढ करून तो 44 टक्के इतका करण्यात आला आहे. या संबंधित निर्णय हा बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे.
www.konkantoday.com