सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात परप्रांतिय फास्टर बोटींचा धुडगूस
हर्णे बंदर येथील सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात परप्रांतिय फास्टर बोटी आणि पर्ससीननेटव्दारे मासेमारी करणा-या बोटी या आपली मासेमारी करण्याची हद्द ओलांडून समुद्र किनाऱ्यापासून 10 वावाच्या आतमध्ये गेल्या चार दिवसापासून राजरोसपणे मासेमारी करत आहेत.असे असतानाही अशा गैरप्रकाराला शासनयंत्रणा प्रतिबंध का बरं करत नाही. हे सारे ठरवून केले जात आहे अथवा अधिका-यांच्या आशिर्वादाने होत आहे. आणि त्यामुळेच येथील पारंपारीक मासेमारी करणा-या मासेमारांच्या तोंडचा घास हिरावून नेणाया अशा या प्रकाराच्या कृतीवर अधिका-यांकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाही.याचे माच्छिमारांना आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या नाराजी पसरली आहे
www.konkantoday.com