वानर-माकडांचा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी गोळप येथे वानर, माकड पकडण्याचे प्रात्यक्षिक यशस्वी
वानर-माकडांचा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी गोळप येथे शुक्रवारी वानर, माकड पकडण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले, जे यशस्वी ठरले आहे. या प्रात्यक्षिकात एकूण ३ माकडांना पिंजर्यात बंदीस्त करण्यात आले. यामुळे वानर, माकडांपासून होणारा उपद्रव कमी करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पडले आहे.
वानर व माकडांच्या होणार्या त्रासामुळे शेतीचे होणारे नुकसान यामुळे कोकणातील शेतकरी त्रस्त झाला आहे. याबाबत अविनाश काळे यांनी पुढाकार घेवून वानर, माकडांचा बंदोबस्त करा, ही मागणी लावून धरली व आता याच्या दिशेने पहिले यशस्वी पाऊल पडलेले दिसत आहे. कारण तीन माकडं यशस्वीरित्या पिंजर्यात बंदिस्त करण्यात यश आले आहे. काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिलोड औरंगाबाद येथील वानर, माकड पकडण्यात निष्णात असलेले समाधान गिरी हे गोळप येथील काळेंच्या घरी आले होते. यावेळी गिरी यांनी २ दिवस परिसरातील भौगोलिक परिस्थिती व तेथील वानर, माकडे यांचा अंदाज घेवून नंतर आपण वानर किंवा माकडे पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवितो, असे सांगितले. त्यानुसार पिंजर्यात ३ माकडे पकडली.
www.konkantoday.com